स्थानिक स्वराज्य संस्थांचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर उपलब्ध व्हावा –

स्थानिक स्वराज्य संस्थांचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर उपलब्ध व्हावा –
भुसावळ : ग्रामपंचायत ते नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार करदात्या नागरीकांच्या माध्यमातून चालतो शिवाय सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मिळणारे वेतनदेखील करदात्या नागरीकांच्या पैशातून होत असल्याने ग्रामपंचायत ते नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर उपलब्ध करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांनी केली आहे. उपाध्याय यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास सचिव यांना पाठवलेल्या निवेदनानुसार नगरसेवकांना दिला जाणारा निधी आणि त्यातून होणारी विकासकामे हीदेखील करदात्या नागरकांच्या पैशातूनच केली जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत केले जाणारे प्रत्येक काम हे केवळ आणि केवळ करदात्यांच्या पैशातून होत असल्याने ग्रामपंचायत ते नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण कारभाराची तपशील/माहिती पब्लिक डोमेनवर खुली करावी, असे निवेदनात नमूद आहे.