भुसावळ – येथिल आजी माजी आमदार व नगराध्यक्षांना हटवून भुसावळ शहर बचाव तसेच दल बदलु नांही हटविण्यात यावे. ओडबसम फॉर्मुला राबवून जनता राज भुसावळात आणणार, सर्वांगीण विकास करणार असे संविधान आर्मीचे तथा कामगार नेते आणि विविध १० संघटनांचे प्रमुख जगन सोनवणे यांनी सांगितले. येथिल शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शहराला लागलेले ग्रहण सोडवून शहर खNया अर्थाने स्वातंत्र करुन या त्रीमुर्तीपासुन आझाद करण्यासाठी येथिल शासकीय विश्रामगृह येथे कामगार नेते जगन सोनवणे, नगरसेविका व माजी पंचायत समिती सदस्या, मोलकरीण नेत्या पुष्पा जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विविध १० संघटनांची भुसावळ शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बैठक झाली.
यावेळी कामगार नेते जगन सोनवणे म्हणाले की, आजी-माजी आमदारांच्या भांडणामुळे भुसावळचा विकास खुंटला आहे. माजी आमदार संतोष चौधरी व आमदार संजय सावकारे यांच्यातील भांडण आणि उदासीन धोरणामुळे भुसावळकर जनतेला विकासापासून लांब राहावे लागत आहे. त्याचप्रमाणे आजी-माजी आमदारांनी भुसावळकर जनतेस न्याय दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता जनतेला विकासाची अपेक्षा राहिलेली नाही. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी कोरोनाकाळात काहीच कामगिरी केलेली नाही. कुठल्याच नागरी सुविधा भुसावळकर जनतेला दिलेल्या नाहीत. पाणी दिलेले नाही, रस्ते तयार केलेले नाही तसेच नगराध्यक्ष रमण भोळे हे विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्या कार्यकाळात समस्स्याच समस्या आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकदृष्ट्या नगराध्यक्षांनी राजिनामा द्यावा. आजी माजी आमदारांचे व नगराध्यक्ष यांचे माघे फिरणाNयांना हटवून भुसावळ शहर बचाव आणि विश्वास, विकास ही संकल्पना राबवून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व जातीय धर्मीय यांना सोबत घेऊन तयार केलेला ओडबसम फॉर्मुला राबवून सोशल इंजिनिअरिंग करुन भुसावळची सत्ता जनतेच्या हाती देणार असून जनता राज शहरात निर्माण करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.

दल बदलु नेते हटाव भुसावळ शहर बचाव
आजी माजी आमदार व नगराध्यक्ष स्वार्थासाठी व स्वविकासासाठी दलबदलूपणा करून सतत पक्षांतर करीत आहे. मात्र शहर विकास व जनविकास करीत नाहीत उलट स्वार्थासाठी स्वविकास करीत आहेत आणि भुसावळकर जनतेच्या पाठीत खंजीर खुपसले आहे त्यामुळे या तिन्ही नेत्यांना भुसावळकर जनता नगरपालिकेच्या यंदाच्या निवडनुकीत धडा शिकविणार आहे. शहरात जनताच जनता राज निर्माण करणार आहे. हे परिवर्तन अटळ आहे. भुसावळकर जनतेचे पाण्यासाठी हाल झाले.रस्त्यासाठी हाल सुरू आहे.कोरोना काळात कुठलेही जीव वाचवणारे साधन उपलब्ध नव्हते व औषधीसाठी नागरिकांचे हाल झाले. कुठल्याही नागरी सुविधा नाही. त्यामुळे जनता त्रस्त आहे.या सर्व परिस्थितीला आजी माजी आमदार व नगराध्यक्ष हेच जबाबदार आहे. तेव्हा यांना मतपेटीतून धडा शिकविण्याची गरज आहे. आजी माजी आमदार व नगराध्यक्षांचे सहकारी नगरपालिका निवडणुकीत उभे राहतील तर यांच्या डिपॉझिट जनता जप्त केल्याशिवाय राहणार नाही. ओडबसम जनता राज झकास आघाडी स्थापन करून व सर्व अपक्षांना पुरस्कृत करून नवीन चेहNयांना आम्ही आघाडीतर्फे नगरपालिका निवडणुकीत टिकीट देणार आहोत. तसेच जिल्ह्यातही सर्वत्र स्वबळावर निवडणूका लढवू अशी घोषणाही करीत आहोत. सत्तेत आल्यावर सर्वप्रथम शहरातील सर्व बेरोजगार तरुणांना नगरपालिकेचे कॉम्प्लेक्स त्यांना कुठलीही डिपॉझिट न घेता १०० रुपये प्रतिदिन या पद्धतीने भाडेतत्त्वावर बेरोजगार तरुणांना गाळे देऊ. स्वयंम रोजगार देऊ तसेच आतापर्यंत सत्ताधारी वर्ग त्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदाराना ठेका(कंत्राट) देत आलेले आहे. ही प्रथा बंद करू व सर्व बेरोजगार तरुण-तरुणींना कंत्राट देऊन त्यांची बेरोजगारी दूर करू. बेरोजगारांना स्वावलंबी बनवून कंत्राटदारांना उद्योग-धंद्यात लावू. जेणे करुन तरुण निराशेमुळे आत्महत्या करणार नाही.
रस्ते पाणी व सर्व नागरी सुविधा आणि आरोग्य व साफसफाई अभियान सतत राबवत राहू. गरिबाना नगरपालिका रुग्णालयातून मोफत औषधी रुग्णांना देऊ तसेच संपूर्ण शहरास प्रकाशमय करू. वार्ड व शहरात दिवाबत्तीची सोय करु. तसेच प्रत्येक वार्ड व शहरातील चौकात तक्रार पेटी ठेऊन प्रत्येक नागरिकाच्या तक्रारी आम्ही जाणून घेऊ व त्यापद्धतीने उपाययोजना करू तसेच शहरात शाळकरी मुलामुलींना, कॉलेज विद्यार्थी-ेविद्यार्थिनींना व कामगारवर्गाच्या सेवेसाठी सिटी बससेवा सुरू करू. प्रत्येक वार्डात वृद्धांसाठी मोफत वर्तमानपत्र वाचता यावे यासाठी वाचनालय सुरू करण्यात येईल. भुसावळ शहरात सुंदर संविधान पार्क तयार करण्यात येईल. देशभक्तांच्या नावाने चौकांचे नामकरण करण्यात येईल. महिलांना २४ तास पाणी मिळावे यासाठी पाण्यासाठी संपूर्ण नियोजन व काळजी घेऊ गरिबांना व दारिद्यरेषेखालील जनतेला नगरपालिकेतर्फे घरकुल देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. बेघरकुल वासियांना घरकुले बांधून देऊ. झोपडपट्टीवासीयांना सुद्धा ओपन स्पेस जागा देऊ(प्लॉट) वाटप करू. तसेच भुसावळचे नाव उंच करण्यासाठी क्रीडाप्रेमी व कलावंत यांना ग्राउंड व कलामंच उभारून देऊ तरुणांसाठी मोफत व्यायम शाळा निर्माण करून देऊ महिलांना घरोघर लघुउद्योग निर्माण करून देण्यासाठी व्यवसायिक महिला किंवा औद्योगिक महिला निर्माण करण्यासाठी नगरपालिकेतर्फे सामूहिक महिला उद्योग मार्गदर्शन केंद्र स्थापन करू. जनतेसाठी दर महिन्याच्या एक तारखेला नित्यनेमाने जनता दरबार कार्यक्रम नगरपालिकेमध्ये भरविण्यात येईल. नगरसेवक व नगराध्यक्ष आपल्या दारी हा उपक्रम प्रत्येक वार्डात आम्ही ३ महिन्यानंतर आम्ही एकत्र येऊ प्रत्येक तीन महिन्यांनी प्रत्येक वार्डात नगरपालिका प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम ही नगरपालिकेतर्फे राबविण्यात येईल. जेणेकरून जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास या उपक्रमाद्वारे समस्या निवारण होईल. नगरपालिकेचे आरोग्य विभागाकडून दर महिन्याच्या पंधरा तारखेला प्रत्येक वार्डात मेडिकल कॅम्प उभारण्यात येईल. नगरपालिकेतर्फे सविधान भवन निर्माण करू सविधान विषयक सविस्तर माहिती देण्यात येईल. तरुण-तरुणींना नगरपालिकेत रोजगार मार्गदर्शन केंद्र व रोजगार दिला जाईल. तापी नदीवर तापी पर्यटन स्थळ निर्माण करण्यात येईल. कोणतेही व्यक्ती मृत्यू पावल्यास त्यांच्या अंतिम संस्काराची लाकड गरिबांना मोफत पुरविण्यात येईल. शहरात डांबरीकरणाच्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणचे संपूर्ण रस्ते बनविण्यात येईल. गरिबांसाठी दररोज शंभर किलोची खिचडी बनवून लंगर दिले जाईल. सर्व महापुरुषाचे पुतळे निर्माण करु. जनतेने साथ व ताकद-शक्ती द्यावी कारण जनता राज निर्माण करण्यासाठी लढाई सुरु राहिल. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडाल तर ही ओडबसम क्रांति होणार नाही. जनता राज येणार नाही. जातीच्या व धर्माच्यापलीकडे जाऊन शहर विकास शहर झकास करण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे कामगार नेते जगन सोनवणे व मोलकरीण नेत्या पुष्पा जगन सोनवणे यांनी सांगितले. यावेळी राकेश बग्गन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


