नागरिकाच्या सर्तकामुळे पशुधनाच्या चार गाड्या पोलीसाच्या ताब्यात : ३८ पशुधनाची गो शाळेत रवानगी :


वरणगाव – भुसावळ तालुक्यातील हतनूरगावी तापी नदीच्या पुलावरून पशुधनाच्या चार गाड्या जात असताना येथील नागरिकांनी गाडया थाबविल्याने पशुधन असल्याचे लक्षात आल्याने त्यांना पोलीसाच्या करण्यात येऊन पशुधनाची गो शाळेत रवानगी करण्यात आली आसुन सहा व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

  या बाबत वृत असे की तालुक्यातील हतनुर गावातील मागील काही दिवसा पुर्वी शेतकऱ्याचे बैलजोडी अज्ञात व्यक्तीने चोरीस गेली होती त्या अनुषंगाने येथील पोलीस पाटील वासुदेव मुरलीधर इंगळे , निवृती मधुकर सपकाळे, निलेश गोसावी सह गावातील नागरिकाना सावदा येथुन पशुधनाची वाहने  हतनूर गावाकडे येत असल्याची खबर मिळाल्याने ते  तापी नदीच्या पुलावरून ये जा करणाऱ्या वाहणाची चौकशी करीत असताना सदरची चार वाहनात ३८ बैलजोडी  सावदा येथुन वरणगाव जात असल्याने त्या गाड्याना थाबवुन त्यांची चौकशी केल्याने त्यात निर्दयीपणे , बोलजोड्या कोबलेल्या अवस्थेत अढळल्याने त्यांनी तत्काळ वरणगाव पोलीसाना यांची माहीती देत वाहन क्र एम एच 0४ एफ डी २७o७ , २) एम एच ४६ ए एफ oo३५ , ३) एम एच o ४ जी आर १८३२ , ४ ) एम एच १३ ए एक्स ३०५० हि चारही पशुधनाची वाहतूक करणारे वाहने पोलीसानी ताब्यात घेऊन त्यावरील चालक शे ईप्तीयार शे सत्तार , रा नागछाप झोपड पट्टी मालेगाव , मजफर खान मुक्तार खान रा कमलापूर मालेगाव , शे जुनेद शे जमील रा मोताळा , शे शबार शे सुपडू रा मोताळा , सैयाद रफीक सैयद मुस्ताक (मजुर ) , शे अकील शे खलील  रा वगारी ता जामनेर यांना ताब्यात घेऊन  पोलीस कॉ प्रशांत विनायक ठाकुर यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा सर्व ३८ पशुधनाची जळगाव येथील गो शाळेत रवानगी करण्यात आली आहे