भुसावळ : आमदार संजय सावकारे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले असून त्यावरील लोकांना संदेश पाठवून पैसे मागितले जात असल्याचा गंभीर प्रकार रविवारी उघड झाला आहे. आमदारांना या प्रकाराची माहिती कळताच त्यांनी नागरीकांना या क्रमांकावरून आलेली रीक्वेस्ट न स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, फेसबुककडे या बाबीची तक्रार करण्यात आल्याने ही खाते तातडीने बंद करण्यात आले आहे.

भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयातर करण्यात आले व आमदारांच्या मित्र मंडळींना रीक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याची बाब रविवारी घडल्यानंतर काहींनी आमदारांना ही बाब कळवताच त्यांनी सोशल मिडीयातून या खात्यावरून आलेली रीक्वेस्ट न स्वीकारण्याचे आवाहन केले होते. आमदारांनी याबाबत फेसबुककडे तक्रार केल्यानंतर तातडीने हे खाते ब्लॉक करण्यात आले.


