ऑन लाईन व्याख्यान कार्यक्रम : नाहाटा महाविद्यालयात डाॅ. सुधा मोकाशी उपक्रम संपन्न :

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग,नियोजन अभ्यास मंडळ आणि मराठी अर्थशास्त्र परीषद यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅ.सुधा मोकाशी उपक्रमाअंतर्गत व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठी अर्थशास्त्र परीषदेचे अध्यक्ष डाॅ.अनिल सुर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष डाॅ.के.के. पाटील,कार्यवाह खजिनदार डाॅ.मारोती तेगमपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.मिनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डाॅ.एस.व्ही.पाटील,डाॅ. बी.एच.ब-हाटे, डाॅ. ए.डी.गोस्वामी, डाॅ.एन.ई.भंगाळे,तर प्रमुख वक्ते म्हणून डाॅ.प्रदीप पुरंदरे (जल व भूमि व्यवस्थापन संस्था,औरंगाबाद)उपस्थित होते.


ऑनलाईन पध्दतीने स्वागत समारंभ संपन्न झाल्यानंतर प्रा.डाॅ.ए.डी. गोस्वामी यांनी महाविद्यालयाबाबत प्रास्ताविक केले त्यानंतर प्राचार्य डाॅ. के.के. पाटील यांनी प्रास्ताविक केले
त्यात त्यांनी मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला.त्यानंतर डाॅ. मारोति तेगमपुरे यांनी परीषदेबाबत प्रास्ताविक केले. त्यात 9जाने.1977 पासून मराठी अर्थशास्त्र परीषद मराठी भाषेतून लिखाण करणारे विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांसाठी खुले व्यासपीठ असून अर्थशास्त्राशी संबंधित प्रश्नांचा उहापोह केला जातो. कोरोनाचा कालखंड वगळता आतापर्यंत परीषदेचे 43 अधिवेशने संपन्न झालेली आहेत. तसेच परीषदेच्या आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांचा नामोल्लेख करून त्यांनी परीषदेमार्फत राबविल्या जाणा-या व्याख्यान व उपक्रमांबाबत माहिती दिली.तसेच संशोधक विद्यार्थ्यांना चालना मिळावी म्हणून परीषदेमार्फत रोख पारीतोषिके दिली जातात अशीही माहिती त्यांनी दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डाॅ.प्रदीप पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाचा आढावा या विषयावर मार्गदर्शन केले.यात त्यांनी महाराष्ट्राचे देशातील पाण्याचे स्थान,राज्यात येवू घातलेली संकटे,जल विकासाचा आढावा,सिंचन प्रकल्पांची दशा,कालोघात झालेले बदल,प्रकल्पांची देखभाल, दुरूस्ती पाणीपट्टी, सिंचन घोटाळा इ. बाबत सखोल माहिती दिली व काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यात त्यांनी देखभालीचा खर्च पाणीपट्टीपेक्षा अधिक आहे.पाणीपट्टी मात्र त्याप्रमाणात आकारली जात नाही.पाणीपट्टीच्या वसूलीपेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक आहे.पाणी सर्वांना हवे आहे, परंतू पाणीपट्टी कुणी भरायला तयार नाही अशी अवस्था राज्यात आहे. शिवाय जलविकासाचे विविध पर्याय,जल विकासाचे महत्त्व,पाणलोट क्षेत्र विकास,लघुपाट बंधारे, शेततळे,पाणी उपलब्धता, सिंचनक्षमता,सिंचन प्रकल्प, पाणी वापर इ. बाबत सखोल माहिती त्यांनी दिली.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. अनिल सुर्यवंशी यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी आपले विचार प्रकट करतांना ते म्हणाले की, मराठी अर्थशास्त्र परीषदेला 46 वर्षांची वैचारीक परंपरा लाभलेली आहे. यजमान महाविद्यालय आणि मराठी अर्थशास्त्र परीषदेचा अतिशय जवळचा संबंध असून 22 नोव्हें. ते 24 नोव्हें. 2012 मध्ये परीषदेचे 36वे राष्ट्रीय अधिवेशन महाविद्यालयाने यशस्वीरित्या पार पाडले असा उल्लेख करून डाॅ. सुधा मोकाशी उपक्रमाचे उगमस्थान यजमान महाविद्यालयच आहे ही आठवण त्यांनी करून दिली. त्यानंतर त्यांनी आजच्या वक्त्यांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.किरण वारके यांनी तर वक्त्यांचा परीचय प्रा.व्ही.ए.सोळुंके यांनी करून दिला.आभार प्रा.एस. टी.धुम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.एस.टी.धुम,डाॅ.किरण वारके,प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.जितेंद्र आडोकार, प्रा.सौ.उज्ज्वला महाजन यांनी परीश्रम घेतले तर तांत्रिक सहकार्य संगणक विभागातील प्रा.हर्षल पाटील व दीपक वाणी यांनी केले.
………..