भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांमधील टॅलेंटचा जगभरात गाजणार डंका ; वरणगाव परीसरातील युवकांनी चित्रपट क्षेत्रात टाकले पाऊल – ‘ प्यार जहाँ संघर्ष ‘ही सर्व शक्तिमान’ शॉर्ट फिल्म 28 रोजी यु ट्यूबवर झळकणार ;


भुसावळ – तालुक्यातील वरणगाव परीसरात युवकांनी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले आहे. ग्रामीण भागातील युवकांनी मिळून ‘प्यार जहाँ संघर्षही सर्व शक्तिमान’ नावाची शॉर्ट फिल्म तयार केली असून 28 रोजी ती यु ट्यूबवर झळकणार आहे. ग्रामीण भागातील युवकांमधील टॅलेंट या माध्यमातून जगासमोर येणार असून भूसावळ तालुक्यासह वरणगाव- पिंपळगावचे नावही या निमित्ताने सर्वत्र झळकणार आहे
प्रेम कथेवर आधारीत ही शॉर्ट फिल्म असून पहिला भाग अर्ध्या तासाचा तर नंतरचा भाग तासभराचा असणार आहे दुसर्‍या भागात चित्रपटातील सस्पेन्सचा उलगडा होणार आहे.

 डायरेक्टर विशाल बोदडे असून रायटर विष्णू राणे व डीओपी सुयोग नाईक आहेत. शॉर्ट फिल्ममध्ये प्रमुख कलाकार म्हणून विष्णू राणे, अंकिता बोदडे, अंकुश कुमार, ऋषिका इंगळे, अजय मेढे, डॉ.विजय सुरवाडे, कोमल इंगळे, सुनील वाघ, भोला इंगळे, शुभम अवचारे, विजय ठोसर, आनंद हिवरे, संजय डांगे, शुभम मेंढे, पांडुरंग अवचारे, घनश्याम इंगळे, अमोल पाटील, राहुल अवचारे, विशाल इंगळे, रवी इंगळे, आदेश वानखेडे आदी कलाकारांचा सहभाग आहे.

या शार्ट फ़िल्मच्या शूटिंग करीता इकडे फिकडे फिरावे लागले नसून ग्रामीण भागातच या फ़िल्मचे चित्रीकरण झाले हे कौतुकास्पद
ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये मोठे टॅलेंट आहे व या टॅलेंटचा योग्य पद्धत्तीने वापर करून शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. वरणगावसह परीसरातच चित्रपटाचे शुटींग झाले असून स्थानिक कलावंतांना त्यात अधिकाधिक प्रमाणात संधी मिळाली आहे.