साकेगाव ग्रामपंचायत तर्फे जिजामाता उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम


भुसावळ – स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांसाठी उद्यान सुशोभीकरणाचा निर्णय घेऊन उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे .स्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हास्तरीय पायाभूत सुविधा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर राज्यस्तरावर दुतीय क्रमांकाने आल्यामुळे गावातील असलेल्या पायाभूत सुविधांच्या त्रुटी भरून काढण्यासाठी गावाच्या बाहेर बस स्थानक परिसरात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उद्यान व चूडामण नगरातील स्मार्ट विलेज मंगल कार्यालय सुशोभीकरणाचा निर्णय घेतलेला असून
उद्यानाच्या व मंगल कार्यालयाच्या परिसरात सरपंच योगिता सोनवणे तथा भारतीय जनता पार्टी किसान मंच तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपण करून उद्यान व मंगल कार्यालय सुशोभीकरण कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे प्रसंगी उपसरपंच आनंद ठाकरे ग्रामपंचायत सदस्य कुंदन कोळी,सागर सोनवाल, गजानन पवार गणेश कोळी सुभाष सोनवणे, सुरेश पाटील, भूषण सिंग राजपूत सचिन सपकाळे ,विष्णू सोनवणे संजय सोनवणे अनिल सोनवाल, सचिन कोकरे भूषण पवार, जीवन पाटील आदींची उपस्थिती होती .

वृक्षारोपण करताना ग्रामपंचायत प्रशासनाने विविध फळझाडे तथा शोभेचे झाडे उद्यान व मंगल कार्यालयात लावण्यात आलेली आहे त्याचे योग्य रित्या संगोपन करण्याची जबाबदारी कर्मचारी वर्गावर सोपविण्यात आलेली आहे त्याचबरोबर उद्यानात लवकरच विविध सुविधा पुरविण्यात येतील गावात व गावाबाहेरील परिसरात सर्वत्र वृक्षारोपण करून संपूर्ण गाव हिरवेगार करणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे .