जळगाव येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबीर संपन्न ; सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेचा स्तुत्य उपक्रम : सुमारे ६० लाभार्थ्यांनी घेतला लाभ :


जळगाव – सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था भुसावळ शाखा जळगाव तर्फे शुक्रवार रोजी डाॅ. विवेक चौधरी यांचे गजानन हार्ट हाॅस्पिटल येथे मोफत हृदय रोग तपासणी करण्यात आली .
यात केन्सुलेशन , ईसीजी,शुगर हे तपासण्या मोफत करण्यात आल्या असून सुमारे ६० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस काॅन्स्टेबल तथा पोलिस विभागातील प्रसिध्द गायक संघपाल तायडे, प्रमुख पाहूणे म्हणून समाजसेवक हेमंत बेलसरे, डाॅ. मौलाना आझाद फाऊन्डेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, प्रमोद घुगे ग्रामपंचायत सदस्य कुसुंबा हे होते.
प्रसंगी डॉ विवेक चौधरीं यांनी
शिबिरात सहभागी रुग्णाच्या हृदया संबंधी ज्या गरजेच्या चाचण्या आहेत त्या मोफत तपासणी केल्या. सखी श्रावणी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी अतिशय सुंदर उपक्रम घेतल्याच्या भावना डॉ विवेक यांनी व्यक्त केल्या .
शिबिर महिला शक्तीने ठेवले ते खरोखर कौतुकास्पद आहे, संस्थेबद्दल बरेच ऐकुन होतो, पण आज प्रत्यक्ष कार्य बघितले, सर्व महीला शक्तीला सलाम व समाज सेवेच्या पवित्र कार्यात सदैव आपले सोबत राहील, असा विश्वास पोलीस संघपाल तायडे यांनी व्यक्त केला .
कोविड १९ च्या या महामारीत जनता अर्थिक दृष्ट्या खुपच खचुन गेली आहे, दोन वेळ पोट भरणे मुश्कील झाले आहे, अशा वेळी दवाखाना म्हटला की अंगावर काटा उभा राहतो, घरातील कर्ती व्यक्ती लाचार होऊन जाते व आजार अंगावर काढते पुढे तो आजार वाढुन जिवास धोका निर्माण होतो अशा बिकट परिस्थितीत अनेक गरजू आहेत या गरजुंना संस्थेच्या माध्यमातून हातभार मिळावा याकरीता सखी श्रावणी संस्थेने मोफत हृदयरोग आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले . डॉ विवेक चौधरीं यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
या शिबीरात ५०-५५ रुग्णांनी सहभाग नोंदवला व लाभ घेतला असेच समाजउपयोगी व समाजहिताचे उपक्रम संस्था नेहमीच राबत राहिल असे मत संस्थापक अध्यक्षा सौ. राजश्री नेवे यांनी व्यक्त केले .
संघपाल तायडे यांनी वीर जवान यांचेवर स्वरचीत गीत सादर केले व समारोप झाला .
माया चौधरी, प्रियंका नेवे, वंदना झांबरे, मिनाक्षी दलाल, मनिषा पाटील, सिमा नेवे, यांचेसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास श्रध्दा मॅडम, उमेश नेवे, कुणाल मोरे, हर्षल नेवे, किरण कोलते व हाॅस्पिटल स्टाफ यांचे अनमोल सहकार्य लाभले.
कोविड १९ च्या त्रिसुत्री नियमांचे पालन करण्यात आले.