भुसावळ –
भुसावळ शहर व परिसरात ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिन शासकीय , निमशासकिय कार्यालय , शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था , राजकीय पक्ष कार्यालय यासह ठिकठिकाणी उत्साहात संपन्न झाला . यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व नियमांचे पालन करण्यात आले .
शासकीय ध्वजारोहण :
येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रांगणावर प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजास पोलिसविभाग व होमगार्ड यांनी पथसंचलन करून मानवंदना दिली .प्रसंगी आमदार संजय सावकारे , तहसीलदार दिपक ढिवरे , नगराध्यक्ष रमण भोळे , मुख्याधिकारी संदिप चिद्रवार ,नगरसेवक , विविध राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते , पोलिस निरीक्षक दिलीप भागवत , बाबासाहेब ठोंबे , रामकृष्ण कुंभार , यांचेसह पोलिस अधिकारी कर्मचारी , महसूल विभाग अधिकारी व कर्मचारी , स्वातंत्र्य सैनिक , अर्जुना संघटना पदाधिकारी ,विविध सामाजिक संस्था पदाधिकारी, जेष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती .
स्वातंत्रदिना निमित्त जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ आप्पा सोनवणे ,सामाजिक कार्यकर्ते जे. बी . कोटेचा , यांचेसह कोरोना काळात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या डॉक्टर्स , पोलिस, सफाई कामगार व पत्रकार यांचा नगरपालिका व अर्जुना संघटनेतर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आबिद सर यांनी केले .



