सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या परिवाराची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य- पालकमंत्री गुलाबराव पाटिल ;


भुसावळ- देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकाला मान-सन्मान दिलाच पाहिजे. सैनिकांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव, कोणी सांगून नव्हे, तर आपल्या मनातून यायला हवी. सीमेवर लढताना मागे आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला लाखे-करोडो बांधव आहेत, अशी सुरक्षिततेची भावना आपण जवानांमध्ये निर्माण करायला हवी आणि ते आपलं सर्वांचं कर्तव्यच आहे . भुसावळ येथे शिवसेना माजी नगरसेवक दीपक धांडे व शारदा धांडे यांच्यातर्फे श्रीनगर भागात आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.देशाची संपूर्ण सुरक्षा ही सैनिकांवर अवलंबून असते. देशाची सुरक्षा करण्यासाठी सैनिक मंडळी डोळ्यात तेल घालून काम करत असतात. अत्यंत कठीण आणि अवघड परिस्थितीच्या वेळी सैनिकांची खरी परीक्षा असते. जेव्हा सर्व नागरिक गाढ झोपेत असतात तेव्हा सैनिक जागरण करत असतात. त्यांच्या सतर्कतेमुळे देशात कोणताही शत्रू प्रवेश करू शकत नाही. भारताच्या रक्षणासाठी जीव गेला तरी बेहत्तर, अशी महत्त्वाकांक्षा ज्यांच्या मनात निर्माण होते, तेच सैनिक होऊ शकतात असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना.गुलाबरावजी पाटील यांनी केले. “मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू’ हे गीत म्हणून पालकमंत्र्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक, माजी नगराध्यक्षा माधुरी फालक, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, निलेश महाजन, नगरसेवक मनोज बियाणी, निर्मल दायामा, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, इलियास शेख, हिप्पी शेठ, जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा, जिल्हा उप युवाअधिकारी प्रवीण पाटील व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक दीपक धांडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.उत्तम सुरवाडे, प्रा.धिरज पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, माजी नगरसेवक ऍड. नरेंद्र लोखंडे, उपशहर प्रमुख राकेश खरारे, स्वप्नील सावळे, पवन नाले, विभागप्रमुख अमोल पाटील, शाखाप्रमुख पिंटू भोई, चेतन भोई, प्रसिद्धीप्रमुख गोकुळ बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.प्रथम पारितोषिक चक्रधर यावलकर, द्वितीय पारितोषिक विकास जंजाळे, तृतीय पारितोषिक संजय सुरवाडे तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक लिशा केदारे यांना मिळाले. विनोद निगम, डी.एम. हेलोडे, जितेश मराठे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.