भुसावळ – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळ येथे माजी सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थिती दिली.
यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत ‘ कर्मा ‘ या हिंदी चित्रपटातील ” हर करम अपना करेगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देगे ऐ वतन तेरे लिये … हे देशभक्तीपर गीत सादर करून देशभक्तीमय वातावरण निर्माण करून उपस्थितांची मने जिंकली . देशभक्तीने ओतप्रोत गीताच्या सादरीकरणाने वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले .
यानिमित्ताने हरहुन्नरी नेतृत्व असलेल्या पालकमंत्र्यांमधील दडलेल्या या गुणांचे टाळ्यांच्या गजरात दाद देत उपस्थितांनी कौतुक केले .



