भुसावळ शहर पत्रकार संस्था,निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळा तर्फे आज वृक्षारोपण


भुसावळ – येथील भुसावळ शहर पत्रकार संस्था आणि निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज रविवारी प्रांताधिकारी कार्यालयआवारात सकाळी 10 वाजता ट्रीगार्ड सह वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे . याकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी रामसिंग सुलाने , आमदार संजय सावकारे, डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे , मुख्याधिकारी संदीप चिंद्रेवार, तहसीलदार दीपक ढिवरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे .याकार्यक्रमास पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी, यांनी कोरोना प्रतिबंधाबाबतचे नियमांचं पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, उपाध्यक्ष गणेश वाघ, आशिष पाटील, सचिव हबीब चव्हाण व निसर्ग, सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे नाना पाटील, रघुनाथ आप्पा सोनवणे ,सुरेंद्र सिंग पाटील यांनी केले आहे .