मानव्यविद्याशाखेतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या बहुसंख्य संधी उपलब्ध- डॉ.जयेंद्र लेकुरवाळे : नाहाटा महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यान संपन्न :


भुसावळ – भुसावळ येथील भुसावळ कला ,विज्ञान आणि पु. ओ .नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील वाद-विवाद मंडळ, वाङ्मय मंडळ आणि नाट्यशास्त्र मंडळ आयोजित’ मानव्यविद्या शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव येथील संरक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ.जयेंद्र लेकुरवाळे हे होते.तसेच कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.सौ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ.ए.डी् गोस्वामी, डॉ. बी. एच. ब-हाटे, डॉ. एन. ई. भंगाळे व वादविवाद मंडळ चेअरमन डॉ.जे.एफ.पाटील,वाङ्मय मंडळ चेअरमन प्रा.दीपक पाटील,नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.वैभव मावळे  उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सौ.मीनाक्षी वायकोळे यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यात आले.

प्रास्ताविक वाद-विवाद मंडळ चेअरमन डॉ.जे.एफ. पाटील यांनी सादर केले. आपल्या भाषणात डॉ. लेकुरवाळे म्हणाले की ,मानव्यविद्या शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षांबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मानव्यविद्याशाखेतील विद्यार्थी चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात. स्वयंरोजगाराच्या संधी सुद्धा सामाजिक शास्त्र व भाषा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. भाषेच्या विद्यार्थ्यांनी पटकथा, संवाद लेखन तसेच स्पर्धा परीक्षेतून  करिअर करावे. त्याचप्रमाणे सामाजिकशास्त्रातील इतिहास, भूगोल ,अर्थशास्त्र ,मानसशास्त्र, तत्वज्ञान,राज्यशास्त्र, संगीत,शिक्षणशास्त्र या विषयांमध्ये सुद्धा विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतो. फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि कष्टाची ,संघर्षाची. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सौ मीनाक्षी वायकोळे म्हणाल्या की ,महाविद्यालयातील मानव्यविद्याशाखेतर्फे अनेक विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात आणि घेतात. मानव्यविद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी करिअरच्या नवीन संधी शोधून आपली रोजगाराची वाट धरावी. मानव्यविद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी चौकस राहून आपल्या विषयाचे ज्ञान प्राप्त करून आपल्या  विषयातील नवीन संधी शोधाव्या. प्रमुख पाहुण्यांचा परिचय वाङ्मय मंडळाचे चेअरमन प्रा. दीपक पाटील यांनी करून दिला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा पुरुषोत्तम महाजन यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. हर्षल पाटील,डॉ. स्मिता चौधरी, डॉ.आर. एस. नाडेकर,प्रा.पुनम महाजन,प्रा. संगीता भिरूड , डॉ. मनोज पाटील आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.