भुसावळ – राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कामाचे कौतुक भारतासह विदेशातूनही केले जात आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना पक्ष घराघरापर्यंत पोहोचवा असे आवाहन रावेर लोकसभा संपर्कप्रमुख प्रमुख विलास पारकर यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केले. तालुक्यातिल वरणगाव येथे प्रभाग क्र.2 च्या मुस्लिम समाज पंच कमेटीच्या सभागृहात शिवसेना भुसावळ तालुका बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीत अध्यक्षस्थानावरून संपर्कप्रमुख विलास पारकर बोलत होते.
प्रमुख अतिथीमध्ये माजी आमदार तथा रावेर लोकसभा सह संपर्कप्रमुख प्रा चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, शिवसेना उर्दू विभागाचे इलीयास सर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, जिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, पं. स. सदस्य विजय सुरवाडे, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली उर्फ हिप्पीशेठ, युवासेना जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, सुरेश चौधरी, दीपक धांडे, प्रा. धीरज पाटील, अँड निर्मल दायमा (चिकू ) , अब्रार खान, सईद मुल्लाजी, योगिता सोनार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, प्रा उत्तम सुरवाडे, इंलियास सर, दीपक धांडे, सईद मुल्लाजी यांनीही आपल्या जोषपूर्ण मनोगतातून शिवसेनेच्या कार्यकर्त्याना संबोधित केले.
या बैठकीला ज्येष्ठ शिवसैनिक निळु सरोदे, सुनील भोई, अशोक शर्मा, तळवेल ग्रा. पं. सदस्य विजय पाटील, पवन मेहरा, नमा शर्मा, राम शेटे, बाळा माळी, हर्षल वंजारी, किरण माळी, विशाल माळी, पवन माळी, सागर माळी, मनोज देवगिरकर, विवेक माळी, शेख फिरोजखान, शेख अय्युबखान, सय्यद अझहरअली, आवेस खान, अजमल खान, मुद्ददसर, फरहाण खान, अबूबकर खान, इंजि.समीर शेख, अरबाज पहेलवान, अरबाज खाटीक, शेख मुददसर, सांडू खाटीक,अब्रार खाटीक, कदीर खाटीक, नदीम खाटीक, मोसिम खाटीक, तोसिफ खाटीक, अवेस खाटीक, नासिर खाटीक, तनवीर खाटीक, वसीम खाटीक, फिरोज खान फिरोज खाटीक, रफिक कंछी, जुम्मन शहा बाबा, सुपडू पिंजारी, सागर वंजारी, राहूल वंजारी, दिपक पाटील, अतुल पाटील, प्रशांत पाटील, रोहित मुळे, कैलास पाटील, कृष्णा पाटील, सम्राट मराठे, पिंटू नेहते, दिपक पाटील, कृष्णा पुजारी, भुषण बाविस्कर, विजय कुंभार, सागर लोंढे, सागर वाघ, राजु परसे, रोहन बोरसे, सुरेश चौधरी, राहुल बावणे, दत्तू भालेराव, अंकुश बोन्डे, नरेश पाटील, निलेश सुरळकर यांच्यासह तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत. सूत्रसंचालन प्रा. धीरज पाटील यांनी तर आभार निलेश ठाकूर यांनी मानले.


