श्रीसंत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
एस.आर रंगनाथन यांची जयंतीनिमित्ताने साजरा होणार्‍या राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस आणि यूनायटेड नेशन्स द्वारा साजरा केला जाणार्‍या आंतरराष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात एक छोटेखानी चर्चासत्राचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, अधिष्ठाता डॉ.आर.बी.बारजिभे, ग्रंथालय समिति प्रमुख डॉ.डि.डि.पाटील,ग्रंथपाल पी.एस.भट, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ.प्रीती सुब्रमण्यम, डॉ. नीता नेमाडे,प्रा.अनिकेत पाठक, डॉ. श्रीकांत चौधरी, प्रा.एन.एम.खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

“नावीन्यपूर्ण संशोधनातून मानव आणि भूतलावरील जीवांच्या आरोग्य आणि अन्नसाखळी प्रक्रियेतील बदलासाठी काम अर्थात ट्रान्सफॉरमिंग फूड सिस्टम्स: यूथ इनोवेशन फॉर ह्यूमन अँड प्लानेटोरी हेल्थ” हे यूनायटेड नेशन्सने युवकांसाठी चे ध्येय ठरवून दिलेले आहे. सद्य स्थितीत मानव आणि एकूणच भूतलावरील जीवसृष्टि साठी आव्हानात्मक परिस्थिति आहे. जैविक आणि वातावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी वैद्यकीय, तांत्रिक आणि मानसिक ह्या तिघही आघड्यांवर मानवाला लढावे लागणार असल्याचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले.येणार्‍या काळातील आव्हाने पेलण्यासाठी मानवाला उपकारक असे तंत्रज्ञान बदल अपेक्षित असून तरुण अभियंत्यांनी वैद्यकीय क्षेत्र तसेच पर्यावरण क्षेत्र पूरक संशोधनातून मानवी जीवन अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.

अधिष्ठाता डॉ.आर.बी.बारजिभे यांनी आंतरराष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने प्रत्येक युवकाने एका महिन्यात दोन पुस्तके वाचण्याचा पण करावा असे आवाहन केले. ग्रंथ हे सगळ्यात मोठे गुरु असून, पुस्तके आणि ग्रंथांच्या सहवासाने कर्तुत्ववान चारित्र्य आणि यशस्वी जीवनाकडे वाटचाल सहज शक्य होते असे सांगितले. प्रसंगी
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी यांनी ह्या उपक्रमाचे कौतूक केले .