भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची पूरग्रस्तांसाठी एक लाखांची वैयक्तिक मदत –

भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी एक लाखांची वैयक्तिक मदत मुख्यमंत्री निधीला दिली आहे. राज्यातील अनेक भागात पूरामुळे अनेक नागरीकांच्या हक्काच्या घराचे नुकसान होवून प्राणहानीदेखील झाल्याची घटना घडली होती तर पुरामुळे अनेक भागात नागरीकांचे संसारदेखील वाहिल्याच्या घटना घडल्या होत्या.

अशा या भीषण परीस्थितीत आपणही समाजाचं देण लागतो या भावनेतून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संजय सावकारे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तिक एक लाखांची मदत दिली आहे.