रावेर (प्रतिनिधी)
येथील एका सराफाच्या दुकानातून दोन अज्ञात महिलांनी सुमारे दिड लाखाचे अडोतीस ग्रॅम वजनाचे मंगळ सुत्र चोरून नेल्याची घटना येथे घडाली . हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज पाहिल्या नंतर उघडकीस आला .या बाबत रावेर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी महिलां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबतचे वृत्त असे की येथील डॉ . हेडगेवार ( चौराहा ) चौकातील महालक्ष्मी अलंकार ज्वेलर्स या सराफाच्या दुकानातून काल (ता.९) रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास दोन अनोळखी महिलांनी दुकानातून सुमारे सुमारे दिड लाख रुपये कीमतीचे साडे अडोतीस ग्रॅम काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेल्याचे दुकान बंद करतांना स्टॉक चेक करीत असताना दूकान मालकाला सोन्याचे मंगळसूत्र कमी असल्याचे आढळून आले . त्यांनी त्वरीत सीसी टीव्ही फुटेज पाहिले असता दोन महिला ग्राहक बनून आल्या होत्या . त्यांनी दुकान मालक व त्यांचा मुलगा यांचा विश्वास संपादन करून हात चलाखीने त्यांचा विश्वासघात करून सोन्याची पोत पाहत असताना त्यातील एक पोत चोरल्याचे निदर्शनास आले असता याबाबत
नरेंद्र भगवान सोनार यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती दिली यावरून घटनास्थळी सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक , मनोज वाघमारे यांनी पाहणी केली.
दरम्यान रावेर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी महिलां विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास तपासी सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक , मनोज वाघमारे करीत आहेत .



