भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे भुसावळ रेल्वे स्थानकावरील गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या कठीण काळात हमाल-कुली बांधवांना अनेक संकटांचा सामना करून जीवन जगावे लागत असून या परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या बांधवांना मदतीचा हात म्हणून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी क्लब अध्यक्षा स्मिता चौधरी, माजी अध्यक्षा सुनीता पाचपांडे, सचिव प्रतीक्षा पाटील, कोषाध्यक्षा रेवती मांडे, आय.एस.ओ सीमा सोनार, सीसी हेमलता सोनार उपस्थित होत्या.



