जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेतील महेंद्र पांडूरंग राजपूत, त्याचा भाऊ उमेश व किरण शरद राजपूत (तिघे रा.मयुर कॉलनी, जळगाव) या तिघांची रविवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. या गुन्ह्यातील जुगल बागुल व भूषण बिर्हाडे दोन जण पसार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.



