भुसावळ : पदभार घेण्यासाठी मुंबईत जाणार्या मध्य रेल्वेच्या नूतन जी.एम.यांचे भुसावळात रविवारी स्वागत करण्यात आले. जीएम अनिलकुमार लाहोटी हे रविवारी पठाणकोट एक्स्प्रेसने जात असतांना गाडी भुसावळात थांबल्यानंतर डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर, पुणे, मुंबई, भुसावळ, नागपूर या पाच विभागांच्या असलेल्या मध्य रेल्वे विभागाच्या जीएमपदी अनिलकुमार लहोटी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी दिल्ली येथे रेल्वे बोर्डात होते तर रविवारी पठाणकोट एक्स्प्रेसने जात असतांना खंडव्यापासून भुसावळ विभागातून जात असतांना त्यांनी विभागाची माहिती डीआरएम गुप्ता यांच्याकडून घेतली. रेल्वे इंजीन कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक शिवराम यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.


