भुसावळ – तालुक्यातील प्रत्येक शासन स्तरावरील गावातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व शासन योजना मिळवुन देण्यासाठी शिवसेना सर्वोतोपरी मदत करणार व लोकांना शिवसेनेच्या दिलेल्या वचनपुर्तीचा मान राखन्याचे काम जिल्ह्यातील शिवसेना करणार असल्याची माहिती दर्यापूर येथील शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिली. या शिवसंपर्क अभियानात जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धिरज पाटील, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हा संघटक सईद मुल्ला, दर्यापूर माजी सरपंच सुनील कोळी, निलेश ठाकूर व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

शिवसेनाप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियान राबवून सर्व शिवसैनिकांनी शासकीय योजनेचा लाभ गोरगरीब जनतेपर्यंत पर्यंत पुरविण्यासाठी व अडीअडचणीमध्ये मदत करण्यासाठी एकत्रित संपर्कात राहून मदत करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी संपर्कात राहावे यासाठीच शिवसंपर्क अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जात आहे व त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील शिवसैनिकांच्या संपर्कात राहून पक्षवाढ करण्यासाठी नियोजन करावे असे आदेश शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत उपजिल्हा संघटक विलास मुळे यांनी दिले.
गावपातळीवरील निराधार लोकांना मदत, गाव विकास कामांसाठी लागणाऱ्या मदतीसाठीचे प्रस्ताव प्रत्येक शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी संबंधित सर्व कार्यालयात पाठविण्यासाठी पुढाकार घ्यावे व अडीअडचणी आल्या तर आम्हाला संपर्क करा आम्ही तात्काळ मदत करण्याचे आश्वासन विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांनी दिले.


