प्रहारची जिल्हा कार्यकारिणी जाहिर ; जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी सचिन सैंदाने , जिल्हा उपाध्यक्ष किरण कोलते , तर चिटणीस म्हणून चेतन पवार यांची नियुक्ति ;


जळगाव –
प्रहार जनशक्ती पक्ष संलग्नित प्रहार शैक्षणिक,सामाजिक व बहुउद्देशिय संघटना महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली आहे . शैक्षणिक,सामाजिक व बहुउद्देशीय कार्याची व चळवळीतील योगदानाचा विचार करुन संघटनेचे राज्य पदाधिकारी विकास घुगे, कृष्णा बोदेले, कृष्णांत गायकवाड व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ राजश्री नेवे , यांच्या मार्गदर्शनखाली सदर नियुक्तयां करण्यात आल्या आहेत .
कार्यकारिणी या प्रमाणे –
जिल्हा संपर्क प्रमुख
सचिन दौलत सैंदाणे
उपाध्यक्ष किरण सुभाष कोलते चिटणीस चेतन हिरालाल पवार (ठाकुर) , सरचिटणीस सुभाष राजाराम सपकाळे , प्रसिध्दी प्रमुख निलेश बाळासाहेब फंण्ड
कार्याध्यक्ष विकी अशोक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
ही नियुक्ती बद्दल संघटनेच्या ध्येयधोरणासह कटिबद्ध असून आपण आपल्या पदाची प्रमाणिक वाटचाल करून संघटनेची व
संघटनेचे प्रेरणास्थान शालेय शिक्षण राज्यमंत्री, बच्चुभाऊ कडू यांचे विचार तळागाळापर्यंत न्यावे
वेळोवेळी संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आदेशानुसार व धोरणानुसार कार्य करावे या सुचनांसह वरिष्ठांनी शुभेच्छा दिल्या . १ वर्षापर्यंत नियुक्ती गृहीत असून कार्य व योगदान बघून पुढील नियुक्ती वाढविण्यात येईल असेही म्हटले आहे .