भुसावळ – महिला पर्यावरण मंच भुसावळ तर्फे,जळगाव जिल्ह्य़ातील पहिली “प्लांट/रोप बँक” भुसावळला सुरू झाली.
यावेळी महिला जिल्हा कार्यध्यक्ष मनिषा पाटील व रजनी सावकारे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी ज्यांना जे रोप हवे असतील तेच रोप देण्यात येईल, मात्र त्या बदल्यात रोप घेणाऱ्या कडचे रोप किंवा बिया दयावा लागतील.व रोपाचे संगोपण होत आहे किंवा नाही त्याचा दर महिण्याला एक फोटो सदस्यांना पाठवायचा आहे असे ठरले.
आंबा,कडूलींब,बदाम, मोहाचे,साग,कढीपत्ता, तुळशी,सोनचाफा व इतर रोप देण्यात येतील. आठ दिवसांनी त्यात वाढ करण्यात येणार आहे. इतर भागातही या प्लांट बँकची शाखा या महिला सुरु करणार आहेत.
अध्यक्षा शालिनी वाढेकर यानी सांगीतले की संपूर्ण जळगाव जिल्हयात ही पाहिली अशी बँक असल्याचे सांगून या बँकेची सर्व संकल्पाना कार्यकारी अध्यक्ष आरती चौधरी यांची असून त्यानुसार संपूर्ण जबाबदारी घेण्यात आल्याचे सांगून वाडेकर यांनी आता पर्यंत केलेले कार्य व उपक्रम बाबत सविस्तर माहिती दिली . तर सौ आरती चौधरी यांनी या प्लांट बँकेचे कामकाज कसे चालेल ते विस्तृत पणे सांगितले. कोठेही पैशाची देवाणघेवाण न होता फक्त रोपांचीच देवाणघेवाण होईल व त्याची संपुर्ण नोंद ठेवली जाईल असे सांगितले

तसेच महिला पर्यावरण मंच भुसावळ तर्फे, जिल्ह्य़ात पहिली “प्लांट/रोप बँक” भुसावळला सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला . या बँकेमध्ये जे रोप उपलब्ध आहेत त्या पैकी जे हवे असेल ते व हवे असतील तेवढे देण्यात येतील मात्र त्या बदल्यात तुम्ही तुमच्या कडचे रोप किंवा बिया बँकेला द्याव्या लागतील म्हणजे कोठेही पैशाचा व्यवहार होणार नाही. या शिवाय एक कार्ड दिले जाईल त्यावर तुम्ही नेलेल्या रोपाची संख्या नोंद केली जाईल म्हणजे जर आज तुम्ही रोप नाही दिलेत तर ठराविक कालावधीच्या आत रोप तुम्हाला द्यावे लागेल. म्हणजे बँक कर्ज देते तसे. आणि जेथे तुम्ही रोप लावाल तेथे आमचे मेंबर्स येऊन बघतील.
सध्या आंबा, कडूलींब, बदाम, मोहाचे, साग, कढीपत्ता, तुळशी, सोनचाफा, व इतर अशी रोप उपलब्ध आहेत. अजून आठ दिवसांत त्यात वाढ होणार आहे.
तसेच जर रिस्पॉन्स चांगला मिळाला तर इतर भागातही या प्लांट बँकची शाखा सुरु करणार आहोत.
या साठी पुढाकार व संकल्पना कार्यकारी अध्यक्ष आरती चौधरी यांची असून सहकार्य अध्यक्ष शालीनी वाढेकर, सारीका चौधरी, भारती चव्हाण, यांचे लाभत असल्याचे सांगितले .सौ. रजनी ताई सावकारे यांनी संकल्पनेचे कौतुक केले व महीलांनी मनात आणले तर छान व उत्तम कार्य करू शकतात. भुसावळचा हा एक आदर्श संपुर्ण जिल्हया समोर राहील. मनिषाताई पाटील जिल्हा कार्याध्यक्ष जळगावहून आल्या होत्या. त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यकारी अध्यक्ष आरती चौधरी,अध्यक्ष शालीनी वाढेकर,सारीका चौधरी,भारती चव्हाण,हेमलता पावसे,संजीवनी यावलकर, सारीका फालक,विजया निकम,अनिता आंबेकर, काजलसेन गुप्ता,रीता नाईक, शितल अरोरा,आरती देशपांडे यांची उपस्थिती होती.सुत्रसंचलन प्रियंका चौधरी यांनी तर आभार शालीनी वाडेकर यांनी मानले.


