कौशल कुंदन वायकोळे याने 100 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला


भुसावळ –
के नारखेडे विद्यालयातील विद्यार्थी कौशल कुंदन वायकोळे इयत्ता दहावीच्या परीक्षेत 100% गुण मिळवत के नारखेडे विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत देखील गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. चि. कौशल वायकोळे याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक कुंदन बळीराम वायकोळे व सरिता वायकोळे यांचा मुलगा आहे.