भुसावळ –
भुसावळ तालुक्यातील शिवसेना शिवसंपर्क अभियानाअंतर्गत वरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक चार ते सहाची सभा संपन्न झाली पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात शिव संपर्क अभियान राबवणे सुरू आहे या अनुषंघाने दिनांक 17 जुलै 2021 रोजी फुल गल्ली येथील जुन्या विठ्ठल मंदिरात प्रभाग क्रमांक चार पाच सहा या तीन प्रभागांची संयुक्त सभा विलास मुळे उपजिल्हा संघटक रावेर लोकसभा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली .
शिवसेना पक्षप्रमुख यांचे विचार व ठाकरे सरकारची कामगिरी सरकारच्या विविध योजना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत
पोहोचवाव्यात असे यावेळी सांगण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक गोविंद मांडवगणे यांनी आपल्या मनोगतातून शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण करून त्यांचे प्रबोधन केले आणि नगरपरिषद वरणगाव मध्ये शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी व भगवा फडकवण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच तालुकाप्रमुख सुभाष चौधरी ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी यांनीही आपल्या मनोगतातून सर्वांना शुभेच्छा दिल्या व शिव संपर्क अभियाना विषयी चर्चा केली यावेळी मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हीप्पी भाई सेठ उपशहर प्रमुख प्रशांत पाटील ज्येष्ठ शिवसैनिक बाळू माळी यशवंत बडे उमेश झांबरे पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे अल्पसंख्यांकांचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी अल्पसंख्यांकाचे तालुका संघटक अब्रार खान आजर खान आबा सोनार अमर सोनार गणेश मराठे भूषण बाविस्कर राम शेटे अतुल पाटील हर्षल वंजारी कृष्णा पाटील पंकज चौधरी कैलास पाटील साई चरण चौधरी राहुल बावणे सागर वंजारी अंकुश बोंडे कुणाल महाजन यांचेसह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते



