चोपडा – पुण्याहून गावठी कट्टा खरेदीसाठी उमर्टीत आलेल्या दोघा तरुणांवर चारचाकीतून आलेल्या दोन ते तीन जणांनी गोळीबार करीत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकी अनिल घोलप व त्याचा मित्र प्रज्ञेश संजय नेटके (पिंपरी-चिंचवड) हे दुचाकीने उमर्टीत गावठी कट्टा घेण्यासाठी गेले असता चारचाकीतून आलेल्या तीन ते चार संशयीतांनी त्यांचा पाठलाग करीत गोळीबार केला. झटापटीत इंडिका कारची दुचाकीला धडक लागल्याने घोलप याच्या पायाला दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेत विकी घोलप याला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले .



