जळगावात टँकरला आग : अग्निशमन दलाच्या सतर्कतेने अनर्थ टळला –


जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर चौफुलीजवळ शुक्रवारी रात्री एका टँकरला अचानक आग लागल्याने धावपळ उडाली मात्र सुदैवाने महानगरपालिकेच्या बंबाने वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने अप्रिय घटना टळली. मनमाड येथील इंडीयन ऑइल प्रकल्पातून टँकर क्रमांक (एम.एच.43-0949) नागपूरच्या दिशेने निघाले असताना कालिका माता चौफुलीच्या पुढे गेल्यावर हॉटेल कमल पॅराडाईजसमोर टँकरमधून अचानक धूर येऊन आग लागली वेेळीच मनपाच्या अग्निशमन दलाला घटना कळवताच तातडीने बंब दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले.

जळगाव अग्निशमन दलाचे वाहन चालक प्रकाश चव्हाण, राजमल पाटील, गंगाधर कोळी, पन्नालाल सोनवणे, जगदीश खडके, नितीन बारी, वाहन चालक देविदास सुरवाडे, संतोष पाटील, मोहन भाकरे, वाहन चालक निवांत इंगळे, वाहन चालक भारत छापरीया, प्रकाश सोनवणे, मदन जराळ आदींनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.