भुसावळ खून प्रकरणी एकास अटक; दोघां फरार आरोपींचा शोध सुरु ;

भुसावळ – शहरातील जामनेर रोड वरील गजाजन महाराज मंदीराच्या जवळ साई सप्लायर्स ऑफीसच्या समोर एका तरुणाची चेह-यावर व हातावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करून व चेह-यावर काहीतरी जड वस्तु मारुन जिवे ठार मारल्याची घटना शुक्रवार रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तपासचक्र फिरवून एका आरोपीस अटक केली असून दोघां संशयीत फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे
यातील फिर्यादी सपना सचिन भगत वय 25. रा. श्रध्दानगर, जामनेर रोड यांनी पती सचिन ज्ञानदेव भगत वय-32 वर्षे यास त्याचे सोबत राहणारे संशयीत प्रशांत ऊर्फ ( मुन्ना ) चौधरी सोबत दोन इसमांनी रात्री 1.15 ते सकाळी 5.15 वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरातील जामनेर रोड वरील गजाजन महाराज मंदीराच्या जवळ साई सप्लायर्स ऑफीसच्या समोर वाद घालून मारण्याचे उद्देशाने त्याचे चेह-यावर व हातावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करून व चेह-यावर काहीतरी जड वस्तु मारुन जिवे ठार मारले
बाबत फिर्याद दिल्यावरुन
बाजारपेठ पोस्टे भाग 5 गुरनं. 323/2021 भादवि कलम 302( मर्डर ) 34 प्रमाणे दिनांक 16.07.2021 रोजी 17.55 वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा गुन्हा घडताच
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी
बाजारपेठ पोलीस .स्टेशनचे तपास पथक तयार करुन आरोपीतास ताब्यात घेणे बाबत आदेश दिले यावरून गुन्ह्यातील आरोपी प्रशांत उर्फ ( मुन्ना ) संजय चौधरी वय-29, रा. पंढरीनाथ नगर, भुसावळ
यास पो. नि दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन दिनांक 16/07/2021 रोजी संध्याकाळी भुसावळ शहरातील साकेगाव शिवारातील जय जवान पेट्रोल पंपाच्या पाठीमागुन सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले असुन ईतर फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे
अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे स्थानिक गुन्हे ( LCB ) चे पो.निरी.किरण कुमार बकाले पो. निरी दिलीप भागवत ,
यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार पेठ पोलीस स्टेशनचे स.पो.नि.कृष्णा भोये , गणेश धुमाळ , अनिल मोरे , मंगेश गोंटला , हरिष भोये , पो.ना.रविंद्र बि-हाडे, दिपक जाधव , रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पोकॉ कृष्णा देशमुख , विकास सातदिवे , योगेश माळी , किशोर मोरे , ईश्वर भालेराव , प्रशांत परदेशी , परेश बि-हाडे यांनी केली आहे.