परशुराम जयंती उत्सव समिति व समस्त ब्राह्मण समाजातर्फे भगवान परशुराम मंदिरात शितल जल सुविधा : शिवसेना संपर्क प्रमुख पारकर यांचे हस्ते आरओ मशिनचे उद्घाटन ;

भुसावळ –
येथील परशुराम जयंती उत्सव समिति व समस्त ब्राह्मण समाज भुसावळ यांच्यावतीने तापी नदी किनारी असलेल्या श्री भगवान परशुराम मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शुक्रवार रोजी थंड पाण्याची मशीन (आर ओ) शिवसेनेचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर , चोपड्याचे माज़ी आमदार तथा सहसंपर्क प्रमुख चोपड़ा मतदार संघ चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येवून मशीन लावण्यात आली .
भुसावळ शहराला लाभलेली नैसर्गिक देणगी म्हणजे सूर्यकन्या तापी नदी होय . शहरासह परिसराला जलपूर्ती करुन सर्वांची तहान भागवणाऱ्या तापी नदी मातेच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधुन तापी आईची पूजा-अर्चना व पाठ मंदिराचे पुजारी यांचे हस्ते करण्यात आले.
सर्वप्रथम भगवान श्री परशुराम ,आई जगदंबा रेणुका माता व गुरुवर्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन नंतर मान्यवरांच्या हस्ते आर ओ मशीन चे उदघाटन करण्यात आले.
यावेळी संपर्क प्रमुख मोहन मसूरकर ,प्रा. उत्तमराव सुरवाड़े नीलेश महाजन, संतोष सोनवणे शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत(नमा)शर्मा देवेश कुलकर्णी, पवन मेहरा परशुराम मंदिराचे ट्रस्टी अरुण पाटिल, डॉ. खाचने, सुरेश पाटिल, सुभाष पाटिल, मंदिराचे पुजारी देवेंद्र जोशी, पुरोहित दीपक पाथरकर, गुरुजी गोपाळ जोशी, रमाकांत केव्हाळकर , प्रभकार जोशी, हेमंत जोशी, कौस्तुभ देवधर , यांचेसह समाज बांधव उपस्थित होते.