भुसावळ शहर कॉग्रेस कमिटी तर्फ़े महागाई विरोधात तहसील कार्यालयावर सायकल रॅली ; तहसिलदार यांना दिले निवेदन ;

भूसावल – येथील शहर कॉग्रेस कमिटी तर्फ़े पेट्रोल, डिझेल ,गॅस, महागाई विरोधात निषेध करीत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास, ताज बाग याना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
यावेळी भाजपा मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
करण्यात आली व सायकल रॅलीस सुरवात करण्यात आली. नाना पटोले प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व संदीप भैय्या पाटिल यांच्या नेतृत्वामध्ये शहर अध्यक्ष रविंद्र निकम व जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुन्नवर खान, माजी आमदार निळकंठ फालक प्रदेश संयोजक भगवान मेढे प्रदेश महासचिव मुक्ती हारुन यांनी पेट्रोल डिझेल गॅस महागाई विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध व्यक्त केला .

  यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष सुनील जवरे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सलिम गवळी, महिला शहर अध्यक्ष यास्मिन बी. शेख तन्वीर, राम अवतार, रघुनाथ चौधरी,जेष्ठ कार्यकर्ते जे.बी.कोटेचा,  सागर कुरेशी, दुर्गा बाई सोनवणे, जिल्हा महिला उपाध्यक्ष राणी खरात,  बाळु सपकाळे, विनोद पवार इमान. ठेकेदार हमीद शेख शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे हमीदाताई गवळी रमजान खाटिक इसाक चौधरी ,जानी गवळी ,वसिम शेख ,शाहनवाज सलिम गवळी, आशिक खान रशिद, कुरेशी शरिफ शहा, सुनील रायमळे ,भिमराव वाघ, मुकुंद टेलर ,शहर सरचिटणीस शैलेश अहिरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते