भुसावळ खाटीक समाजातर्फे तहसीलदार यांना निवेदन :जावेद खाटीकवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा – मागणी


भुसावळ – जावेद खाटीकवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अद्याप पावेतो अटक झालेली नाही, यासाठी भुसावळ खाटीक समाजाने आज 13 रोजी सकाळी 11:30 वाजता
तहसीलदार दीपक धिवरे यांना आरोपींना लवकरात लवकर अटक करुन त्यांना कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन दिले आहे .

जाविद रझाक खाटीक वय ,40, रा.शनि पेठ जळगाव शहरातील रहिवासी  हे आपल्या साथीदारांसह 7 जुलै रोजी रात्री बकरी ईद निमित्त  बळी देण्यासाठी बकरी विकत घेणे आणि विक्रीसाठी जात असताना काही अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना मालेगाव महामार्गावर रात्री 3 ते 4 दरम्यान  थांबविन्याचा प्रयत्न केला मात्र. रात्रीचे वेळेस ड्रायव्हरने वाहन थांबवले नाही, तेव्हा लुटारुंनी रिवॉल्व्हरने गोळीबार केला ज्यात जाविद खटीकच्या (डोक्याला) गोळी लागल्यामुळे  ओम क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अद्यापपर्यंत जावेद खाटीकवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक झालेली नाही, यासाठी भुसावळ खाटीक समाजाने आज 13 रोजी सकाळी 11:30 वाजता
तहसीलदार दीपक धिवरे यांना आरोपींना लवकरात लवकर अटक करुन त्यांना कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन दिले आहे .
यावेळी शफी इसाक खाटीक, हारून खाटीक, रमझान खाटीक, रहीम खटीक, रोशन खाटीक, अजीज खाटीक, सद्दाम खाटीक व खाटीक समाजातील अन्य नागरिक उपस्थित होते.