फैजपूर –
फैजपूर यावल रोडवरील हॉटेल तृभावी समोर वाद घालणाऱ्या दोन तरुणां जवळून पोलिसांनी गावठी कट्टा, जीवंत काडतूसांसह चाकू हस्तगत केल्याची घटना घडली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील फैजपूर यावल रोडवरील हॉटेल तृभावी समोर दोन तरुणांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहिती कळताच पो.हे.कॉ.राजेश ब-हाटे व होमगार्ड श्रीकांत इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता दोन तरुणांमध्ये हातापाई होत असल्याचे दिसून आले. दरम्यान घटनास्थळी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पो.हे.कॉ.राजेश ब-हाटे यांनी पंचांसमक्ष कारवाई करुन गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे व धारदार चाकू हस्तगत करुन दोघा तरुणांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहिती अशी की संध्याकाळी यावल रोडवरील हॉटेल तृभावी समोर दोन तरुणांमध्ये वाद सुरू असतांना अचानक वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले व एकाने दुसऱ्या वर पिस्तूल (गावठी कट्टा) उगारला. या प्रकाराची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांनी पोलीस उपनिरिक्षक रोहिदास ठोंबरे व न्हावी बीटचे पो.हे.कॉ.राजेश ब-हाटे, होमगार्ड श्रीकांत इंगळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली . तेव्हा या ठिकाणी एकमेकांसोबत हाणामारी करतांना संशयीत तरुण विशाल गणेश सपकाळे,वय २९ रा.आमोदा व दूसरा तरुण दिपक शांताराम सपकाळे,वय २६ रा.आमोदा या दोघांना एका गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे व धारदार चाकू सह ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एकूण २३, ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्या दोघा तरुणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा३७(१)(३) प्रमाणे जाहीर आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भा.दं.वि.कलम १६०,१८८,३४, आर्म ॲक्ट ३/२५, ४/२५, महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास स.पो.नि.प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेश ब-हाटे करीत आहेत.


