जळगाव –
अवघ्या ४ वर्षाच्या अल्पकालावधीत भुसावळ शहरासह तालुक्यात व परिसरात विविध समाजपयोगी उपक्रम राबवीत नावालौकिकास आलेली संस्था म्हणजे सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था होय . या संस्थेचे कार्य वाढत असल्याने व महिला स्वयंस्फुर्तिने संस्थेत कार्य करण्यासाठी जोडल्या जात आहे याकरीता आज दिनांक 12 रोजी जळगाव शहर शाखेचे उद्घाटन प्रसिध्द हृदय रोग तज्ञ डाॅ.विवेक चौधरी ( गजानन हार्ट अॅण्ड आय हाॅस्पिटल) यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पर्यावर प्रेमी मनिषा पाटील, योग शिक्षिका महानंदा पाटील होते,
सखी श्रावणी संस्था चे बरेच वेळा विविध माध्यमातुन नाव ऐकले होते, व त्यांचे कार्या बद्दल पण खुप वेळा ऐकले होते, पण आज प्रत्यक्ष कार्यक्रमास उद्घाटक म्हणुन आलो खुप आनंद झाला, संस्थेत सर्व महीला पदाधिकारी आहेत, तरी ही खुप छान उपक्रम हे संस्थाच्या माध्यमातुन राबविले जातात याबद्दल खुप अभिमान वाटतो,जळगाव मधे पण असेच विविध समाज उपयोगी उपक्रम संस्था तर्फे राबविले जावे अशा शुभेच्छा देतो व आमचे कडुन संस्थाचे कार्यास नेहमीच सहकार्य असेल असे मत डाॅ.विवेक चौधरी यांनी व्यक्त केले,
जळगाव येथिल बरेच सखींना सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था मध्ये सहभागी होऊन समाजसेवे चे कार्यास हातभार लागावा अशी इच्छा होती, यासाठी आम्हि सखी श्रावणी संस्थेच्या जळगाव शहर शाखेची सुरुवात केली, व या ठीकाणी प्रथमच भरभरून प्रतिसाद मिळाला, संस्था जसे समाज सेवे चे कार्य आता पर्यंत करत आलेली आहे तसेच कार्य भविष्यातहि अखंड सुरु ठेवेल असे मत संस्थापक अध्यक्षा सौ.राजश्री नेवे यांनी व्यक्त केले,
सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था,भुसावळ शाखा- जळगाव या कार्यालयाचे उद्घाटना नंतर चैतन्य काॅलनीतील मंदिर व परिसरात फळझाडे व फुलझाडे (वृक्षारोपण) लावण्यात आली यात, सिताफळ, पेरू, करवंद, मोगरा, गुलाब, केवडा हे रौपे वाटप करण्यात आली.यावेळी श्रीमती जयाताई भंगाळे यांचे अनमोल सहकार्य लाभले,
माया चौधरी, वंदना झांबरे, दिपिका मेश्राम, प्रियंका नेवे, राजश्री बादशहा, धारीणी असोदेकर, शोभाताई देवराज, अर्चना पाटील आदीं उपस्थित होते . जयाताई भंगाळे यांचे अनमोल सहकार्य लाभले.


