फैजपूर :भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर मा.विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फैजपूर येथे भाजपा कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

नारीशक्ती अध्यक्षा व भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ.दिपाली चौधरी यांना विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी युवती प्रदेश संयोजिका सौ.मिनाताई केदार, भाजयुमो प्रदेश सचिव व जिल्हा प्रभारी श्री.अनिकेत विजय पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.कपिल पाटील,युवती प्रदेश सहसंयोजिका कु.अमृताताई पाटील ,जन संघ सेवक मंच प्रदेश उपाध्यक्ष संदिप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी कोरोना नियमांचे पालन करुन मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला असून याप्रसंगी नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी यांच्यासह सौ. शकुंतला किसन झोपे,सौ.रुपाली किरण चौधरी, सौ.आशा दत्तू पाटील, श्रीमती शशिकला रेवा चौधरी इत्यादी खान्देश नारीशक्ती सदस्या उपस्थित होत्या.


