भुसावळ –
सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी सुरत शहरात पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे .
बाजार पेठ पो स्टेशन भाग 5 गुरन भादवी कलम 353,332,504,506प्रमाणे दिनांक 13/12/2020 रोजी 20.01गुन्हा दाखल असुन यातील फिर्यादी पंकज कमलाकर पाटील रा.प्रभात काॅलनी भुसावळ धंदा-नोकरी (म.रा.वि.कंपनी ) मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञान पदावर नेमणुकीस असुन ते दि.13/12/2020 रोजी रात्री 12.30 वा सुमारास नवीन ईदगाह डीपी खडका रोड भुसावळ येथे लाईट दुरुस्तीचे काम करीत असतांना यातील आरोपी अबरार अहमद शकिल पटेल वय 26 रा.गौसिया नगर भुसावळ याने फिर्यादी यांना मारहाण व शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली होती. त्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल असुन सदर गुन्हा घडल्या पासुन तो फरार होता.
सदर आरोपीची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त बातमी मिळाल्याने तो सुरत शहर (गुजरात) येथे असल्याचे समजल्या वरुन त्या साठी पथक तयार करून सुरत येथे पाठवले असता आरोपीताचा सुरत येथील पोलीस क्राईम ब्रँच यांचे मदतीने सुरत शहरात शोध घेतला असता तो मिळुन आला त्यास चौक बाजार भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रमण सुरळकर, पो.काॅ.विकास सातदिवे, पो.काॅ.ईश्वर भालेराव अशांनी केली असुन पुढील तपास सहा.पो.निरीक्षक मंगेश गोटला व पो.काॅ.गजानन वाघ करीत आहेत.



