मोटरसायकलला स्विफ्टची जोरदार धडक : हॉटेल सहेली जवळ अपघातात ; बहिण भाऊ जागीच ठार ;

वरणगाव –
राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी गावा जवळील हॉटेल सहेलीच्या समोर मोटरसायकलीसह उभे असलेल्या (गाते ता रावेर ) रहिवाशी असलेल्या बहीण भावास चार चाकी कारने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि ११ रविवार रोजी सायकाळी ७ . ३० वाजेच्या सुमारास घडली .

    रावेर तालुक्यातील गाते येथील रहिवाशी असलेले दुर्गेश विनोद कोळी , व पुजा विनोद कोळी हे मुक्ताईनगर येथील नातेवाईकाच्या भेटीस जाऊन घरी  मोटर सायकल क्र एम एच १९ डी आर ६५८४ ने आपल्या घरी परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सहेली समोर सोबत असलेल्या दुसऱ्या मोटर सायकलीने येणाऱ्या नातेवाईकाची वाट पाहत उभे असताना वरणगाव कडून जाणाऱ्या सिप्ट डीझर क्र एम एच ३१ एफ ए ६६३६ ने जबर धडक दिल्याने दोघे बहिण भाऊ जागीच ठार झाल्याची घटना घडली

या बाबत रितेश युवराज कोळी याच्या खबरी नुसार वरणगाव पोलीस स्टेशनला चार चाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.