भुसावळ –
शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सर्विस रोडच्या बाजुला मोठ्या गटारीचे आर.सी.सी. चे बांधकाम काम सुरू आहे . शनिवार रोजी पालखी हाँटेल जवळ भुसावळहुन वरणगावच्या रस्त्याने महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाची बस क्रमांक MH 20 BL 1638 जात असतांना व भुसावळ कडे येणारे राखेचे बॉयलर टँकरचालक MH 19 CY 2943 यांच्यात वाहतुक कोडी झाली यावरुन गटारीचे ठेकेदार व बस चालका मध्ये मोठा राडा झाला .
यावेळी संबधिता मध्ये अश्लील भाषेत एकमेकांना शिविगाळ करीत गोष्ट हातापाई पर्यत आली .

ठेकेदार व बस चालका मध्ये भर रस्त्यावर वाद सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी झाली होती . ठेकेदार व बस चालकाच्या हमरीतुमरी मुळे बस मधील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला . रस्त्यावर एवढा मोठा राडा सुरू असताना देखील पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याने नागरिकां मध्ये चर्चा सुरू असल्याचे दिसून आले .जर या ठेकेदार व बस चालकाच्या हमरीतुमरीमुळे एखादी अनुचित प्रकारची घटना घडली असती तर या प्रकाराला जबाबदार कोण असते अशी चर्चा देखील नागरिकां मध्ये केली जात होती .
सर्व्हिस रोडच्या बाजुला मोठ्या गटारीचे आर.सी.सीचे बांधकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने दररोज किरकोळ वाद होत आहे. यातुन एखाद्या वेळी काही अनुचित घटना घडु शकते हे नाकारता येऊ शकणार नाही . त्यामुळे पोलिसांनी अशा घटना कडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला आवश्यक त्या सुचना दिल्या पाहिजे असे नागरीकांचे म्हणणे आहे .


