जळगाव -
शहरातील खोटेनगर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ एका तरुणाचा खुन झाल्याची घटना आज रात्री घडली. या घटनेमुळे खोटे नगर परिसरात खळबळ उडाली आहे.

महेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या असे मयत तरुणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, जुन्या वादातून खोटेनगरातील रहिवासी महेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या यास एकाने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना आज ९.४५ वाजेच्या सुमारास घटना घडली. खुन झाल्यानंतर परिसरातील नागरीकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. तालूका पोलिस ठाण्याचे निरीक्षकांसह पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला होता.


