भुसावळात पर्यावरण सखी मंच तर्फे रक्तदान शिबीर संपन्न ; 22 दात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-

पर्यावरण सखी मंच व लोकमत तर्फे आय. एम. ए. हाॅल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 22 दात्यांनी रक्तदान केले. गेल्या दोन महिन्यांपासून पर्यावरण सखी मंच या महिलांच्या ग्रुपने पर्यावरणाच्या सुरक्षे साठी व लोकांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहनपर विविध उपक्रम केले आहेत. व आता सामाजिक बांधिलकी न विसरता हिरीरीने रक्तदान शिबिर घेऊन स्वतः रक्तदान केले. या मुळे सर्वत्र पर्यावरण सखी मंचचे कौतुक होत आहे.


यावेळी शालिनी वाढेकर, आरती चौधरी , वैशाली निकुंभ, सोनाली पिंगळे , मनीषा साळी, काजल सेनगुप्ता, रूपाली पाटणकर, अनिता आंबेकर यांनी रक्तदान केले.


या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष मनिषाताई पाटील, महानंदाताई पाटील, जयश्री ताई उपस्थित होत्या. तसेच भारती चौहान, सारीका फालक, विद्या ताई पाटील.व शितल अरोरा यांनी सर्व रक्तदात्यांची काळजी घेउन बिस्किटे काॅफी, ची व्यवस्था बघीतली.
कविता महाले, विजया निकम यांची उपस्थिती होती
या शिबीरात एकुण २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.