भुसावळात सराफ व्यापारी असोसीएशनची बैठक संपन्न :

भुसावळ –
जळगांव जिल्ह्यातील यावल गावामध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा सराफ दुकानात प्रवेश करून चौथा साथीदार दागिने खरेदी करण्याचा बहाण्याने आत प्रवेश करीत दुकान मालकांच्या दिशेने जाऊन बंदूक ताणून दागिन्यांची मागणी करीत व गल्ल्यातील रोकड घेऊन पोबारा झाल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमिवर आज रोजी भुसावळ शहरातील पंचायती वाड्यामध्ये सराफ व्यापारी असोसीएशनची बैठक संपन्न झाली.
शहरातील सराफ व्यापारी असोसीएशनचे बंधूनी आपल्या दुकानाला अदयावत सी.सी.टी.व्ही.कॅमेरे रोडचा भाग दिसेल त्याप्रमाणे लावावे. सराफ दुकानांसाठी स्विकृटी गार्ड 10 ते 15 सराफ दुकानदार मिळून लावावे. शहरात पोलिसांची सराफ बाजारात रात्रीची गस्त करीत असतांना पोलिसांसोबत दररोज 2 -2 व्यापारी मदत म्हणून देण्यात यावे. दुकान बंद केल्यानंतर घरी जातांना आभूषणे काळजीपूर्वक न्यावी.तसेच सराफ व्यापाऱ्यांनी अलाराम सिस्टीम लावावे. अशी माहिती सदर बैठकीत सोमनाथ वाघचौरे उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
याप्रसंगी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्याधिकारी कातोरे,सराफ व्यापारी असोसीएशनचे अध्यक्ष वसंत विसपुते,उपाध्यक्ष शिरीष नहाटा, सत्यनारायण अग्रवाल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *