भुसावळात भारत विकास परीषदेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद ; जनसेवक नगरसेवक पिंटू कोठारींचा सत्कार ;

भुसावळ –
भारत विकास परीषदेच्या स्थापना दिनानिमित्त पांडुरंग टॉकीजमध्ये शनिवारी रक्तदान शिबिर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन रीदम हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन पाटील यांच्या हस्ते तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण डॉ.मंगेश खानापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी कोरोना काळात जनसेवा करणारे जनसेवक नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, डॉ.किर्ती फलटणकर, स्मशानभूमी ठिकाणी अंत्यविधीसाठी सेवा देणारे श्री अरुण रंधे व शववाहिका चालक बाबुभाई यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिरासाठी धनवंतरी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरास भुसावळ शहरातील नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रसंगी भारत विकास परीषदेचे अध्यक्ष विलास फालक, सचिव भूषण वाणी, प्रकल्पप्रमुख गौरव हिंगवे, भारत विकास परीषद शाखा पालक डॉक्टर नीलिमा नेहेते, प्रांत संघटन सचिव योगेशजी मांडे तसेच शाखेतील अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेसाठी भारत विकास परीषदेच्या सर्व सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *