भुसावळात उद्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची दक्षिण विभागाची बैठक ;


भुसावळ,
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार, शिवसेनेचे रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपनेते पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहसंपर्कप्रमुख माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, कार्यलयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धिरज पाटील, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे यांच्या उपस्थितीत रविवार, दिनांक ११ जुलै २०२० रोजी सकाळी १० वा. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसंपर्क अभियान राबवण्याच्या उद्देशाने दक्षिण विभागाचे शहरप्रमुख बबलु बऱ्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, पवन नाले, अन्सार शाह यांनी आयोजित केली आहे.
भुसावळ शहराच्या दक्षिण विभागात १२ जुलै ते २४ जुलै या काळात विविध कार्यक्रम घेऊन शहरातील नागरिकांशी संपर्क वाढवण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे तसेच ठाकरे सरकार ज्या योजना रावबत आहे, त्या योजना लोकांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत. दक्षिण विभागातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच रेल कामगार सेना, शिक्षकसेना, ग्राहक संरक्षण कक्ष, अल्पसंख्याक आघाडीच्या आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *