भुसावळ (प्रतिनिधी )-

भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे आणखी एका मुलीची आनंदाने सासरी पाठवणी करण्यात आल्याने पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला .
यात केतन दिलीप चौधरी (नाशिक) व सौ वीणा (कटोरी, जि. बालाघाट) यांचा विवाह दि. १५-६-२०१९ रोजी संपन्न झाला.
लग्नानंतर दोघांमधे कुरबुरी सुरू झाल्या. त्यातच वीणाला दिवस गेले. बाळ झाल्यावर कुरबूरी संपुष्टात येतील असे वाटले पण झाले उलटच मुलगी झाल्यावर मतभेद अजूनच वाढले व सौ. वीणा बाळाला घेऊन माहेरी निघून गेली. पण भोरगाव पंचायत कार्यालयात घटस्फोटासाठी आलेली असताना, सपुदेशन करुन लग्न वाचवण्याचा प्रयत्न करू असे संचालकांना वाटतले व सौ. वीणाच्या संमतीने समुपदेशन करण्याचे ठरविण्यात आले. समुपदेशन कक्षाच्या चेअरमन सौ. आरती चौधरी यांनी वीणा व केतन दोघांशी बोलून समजावून सांगितले. वेगवेगळ्या त-हेने समजावून, दोघांनाही एकमेकांच्या चूकां बद्दल सांगून एकत्र येण्यासाठी समजावले. याचा परिणाम असा झाला की दोघेही आनंदाने संसार करण्यासाठी तयार झाले. व समुपदेशन यशस्वी झाले. आवश्यक ते कागदपत्रे तयार करून कार्यालयातूनच सौ. वीणाची सासरी पाठवणी केली. या प्रसंगी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, सचिव डाॅ. बाळू पाटील, सुहासदादा चोधरी, श्री. परिक्षीत ब-हाटे व समुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी हजर होते .


