भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे हॉस्पिटल भुसावळ येथे दुसरा ऑक्सिजन प्लांट दिनांक २९.०६.२०२१ रोजी कार्यान्वित करण्यात आला. विभागीय रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ऑक्सिजन प्लांट आणि ऑल बॉडी एक्स रे मशीन चे उदघाटन करण्यात आले.
दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटची वैशिष्टय म्हणजे याची क्षमता ५०० लिटर प्रति मिनिट आहे.मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शन मध्ये मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ. एस के मांडवी, डॉ एस के अंबुस्कर यांच्या निरीक्षण मध्ये ऑक्सिजन प्लांट ची निर्मिती करण्यात आली. याप्रसंगी अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा, मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ. एस के मांडवी, डॉ एस के अंबुस्कर तथा अन्य डॉक्टर ,अन्य शाखांचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी कोविड -१९ साठीचे सर्व प्रोटोकॉल चे पालन करण्यात आले.



