गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मोफत सीईटी अर्ज सुविधा ; विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कक्ष स्थापन – डॉ.राहुल बारजिभे


भुसावळ (प्रतिनिधी )-
2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी एमएचटी-सीईटी 2021 प्रवेश परिक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परिक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाईन नोंदणी 8 जून ते 7 जुलै 2021 पर्यंत तर विलंब शुल्कासह 8 ते 15 जुलै 2021 असा कालावधी दिला आहे.
विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परिक्षेेचे अर्ज भरण्यात बर्याचवेळा चुका होतात, धावपळ होते. या दृष्टीने श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात या परिक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. तरी त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कक्ष स्थापन;
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत भाग घेतांना विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. जात पडताळणी, नॉन क्रिमिलेयर दाखले वेळेत सादर न केल्यास प्रवेश रद्द होऊ शकतात.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि पालकांचे आर्थिक नुकसान होते. विद्यार्थी व पालकांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात “विद्यार्थी मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. एक फोटो ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, फोटो व इतर आवश्यक कागदपत्रांनिशी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.राहुल बारजिभे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *