भुसावळ (प्रतिनिधी )-

आयुध निर्माणी भुसावळ येथे सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी महाप्रबंधक
वसंत निमजे.
अप्पर महाप्रबंधक राजीव कुमार यांनी ओमच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात केली. यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांनी मोठ्या प्रमाणात वेबेक्स ॲप च्या मदतीने मोबाईल वरून ऑनलाईन योग प्राणायाम अभ्यास सकाळी 6:00 ते 6:45 वाजता आपल्या घरातच बसून केला. ऑन लाइन योग वर्ग योग गुरु
एम.एस.राऊत
यांनी घेतला .
आयुध निर्माणी परिसरात योग ध्यान साधना केंद्राचे भूमिपूजन2
21 जून जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून आयुध निर्माणी भुसावळ येथे योग साधना केंद्राचे भूमिपूजन
वसंत निमजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विशेष उपस्थिती महिला कल्याण समिती अध्यक्षा
श्रीमती वैजयंती निमजे व
अप्पर महाप्रबंधक राजीव कुमार
ले.कर्नल , ए.एस.देशपांडे
श्रीमती मृणाल देशपांडे यांनी
पूजा करून कार्यास सुरुवात केली.
यावेळी महाप्रबंधक यांनी आपल्या भाषणात सांगितले की निर्माणी मधील अधिकारी कर्मचारी यांच्या परिवारातील सदस्यांसाठी योग साधना केंद्राचे काम चालू केले आहे. लवकरच त्यामध्ये योग प्राणायाम ध्यान साधनेचे वर्ग चालवले जातील त्यामुळे सर्वांचे स्वास्थ्य निरोगी राहील अशी आशा त्यांनी व्यक्त करून सर्वांना योग प्राणायाम दररोज करण्याची शपथ दिली योग गुरु श्री एम एस राऊत यांनी आपल्या जीवनात योगाचे महत्त्व समजून सांगितले नियमित योग करणे आपल्या आरोग्यदायी हिताचे आहे असे ते म्हणाले
यावेळी प्रमुख उपस्थिती आयुध निर्माणी येथील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व युनियन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जेसीएम कार्यसमिति सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार
व्ही.ओ.स्वामी यांनी केली


