परिषदेत १५५ संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांचा सहभाग
रसायनशास्त्रातील वैविध्यतेचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा
– संजयकुमार नाहाटा ;
आंतरराष्ट्रीय परिषदांमधून संशोधकाला संशोधन करण्याची प्रेरणा मिळते -प्राचार्य डॉ. सौ. मीनाक्षी वायकोळे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे (CPCS-2021) ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली.
या परिषदेचे उदघाटन संजयकुमार नाहाटा (कोषाध्यक्ष, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन समारंभास प्राचार्य डॉ. सौ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे , परिषदेचे चेअरमन डॉ. सचिन येवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या परिषदेत रसायानशास्त्रातील सिद्धांतीक व गणकीय रसायनशास्त्र, रासायनिक अभिक्रिया, जैविक उत्पादकता, हरित रसायनशास्त्र, पर्यावरण रसायनशास्त्र, पॉलीमर रसायनशास्त्र इ. रसायनशास्त्रातील वेगवेगळ्या विषयांबद्दल मार्गदर्शन झाले.. या परिषदेत संशोधक व विद्यार्थी मिळून देशभरातील १५५ संशोधक प्राध्यापकांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. सौ. मीनाक्षी वायकोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले कि, अशा प्रकारच्या परिषदांमुळे संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची चालना मिळते तसेच संशोधन हे पूर्णतः सत्यतेवर आधारित असावे व समाजोपयोगी असावे जेणेकरून अशा संशोधनाचा लाभ भावी येणाऱ्या पिढ्यांना घेता येईल. व आजकालच्या संशोधनात काही ठिकाणी सत्यता कमी आढळते ही चिंतेची बाब आहे म्हणूनच जास्तीत जास्त चांगले संशोधन होण्यासाठी अशा परिषदा प्रेरणादायी ठरतात. त्याच प्रमाणे कोरोनाची काळजी घेऊन आपले कार्य पुढे चालू ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक संजयकुमार नाहाटा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले कि, या परिषदेमध्ये मार्गदर्शनासाठी आलेल्या शास्त्रज्ञांच्या विषयाच्या वैविध्यतेच्या जास्तीत जास्त लाभ सहभागी सदस्यांनी करून घ्यावा. तसेच दैनंदिन जीवनात उपयोगात येतील अशा संशोधनाचा मार्ग अवलंब करावा. तसेच त्यांनी परिषदेत सहभागी सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
यांनतर प्रथम सत्रात प्रोफेसर राजेंद्र झोपे , अमेरिका यांनी डेन्सिटी फंक्शनल थेअरी मधील नवीन बदल तसेच त्यांच्या ग्रुप ने शोधलेले एस. आय. सी – डी. एफ. टी या पद्धती बदल माहिती दिली. त्यांनी ही पद्धती चा मटेरियल सायन्स मध्ये विविध प्रकारच्या प्रॉपर्टी शोधण्या साठी कशा प्रकारे वापर केला जातो हे विशद केले. यानंतर व्दितिय सत्रात डॉ. विजयसिंग परिहार, फिनलंड यांनी बायो कॉन्जुगेशन या पद्धतीचा सेंद्रिय रसायनशास्त्र आणि त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रात कसा उपयोग होतो हे विशद केले. तृतीय सत्रात डॉ. अजय पाटील, स्विझर्लंड यांनी रसायनशास्त्राचे शाश्वत विकासात काय योगदान आहे हे विशद केले. त्याच प्रमाणे रेअर अर्थ मेटल च्या एक्सट्रेक्शन बद्दल माहिती दिली.
या परिषदेसाठी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन मा. महेश फालक , सेक्रेटरी मा. विष्णू चौधरी व सर्व संचालक मंडळाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ही संपूर्ण परिषद प्राचार्य डॉ. सौ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे चेअरमन डॉ. सचिन येवले, परिषदेचे समन्वयक डॉ. उमेश फेगडे, सचिव प्रा. चंद्रकांत सरोदे , उपसचिव डॉ. विलास महिरे, डॉ. जी. आर. वाणी, प्रा. डी. एन. पाटील, परिषद कोषाध्यक्ष प्रा. संगीता भिरूड, प्रा. नीलिमा पाटील, प्रा. तेजश्री झोपे, डॉ. सचिन कोलते, डॉ. अजय क्षिरसागर, प्रा. शंकर पाटील, प्रा. हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले. असे परिषद प्रसिद्धी समिती प्रमुख प्रा. प्रशांत पाटील यांनी कळविले आहे.


