भुसावळ –
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे आणि बिलासपूर दरम्यान साप्ताहिक विशेष अतिजलद ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
ट्रेन क्रमांक 08230 विशेष अतिजलद साप्ताहिक दि. २.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत दर शुक्रवारी पुण्याहून १७.४० वाजता सुटेल आणि बिलासपुर येथे दुसर्या दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 08229 विशेष अतिजलद साप्ताहिक दि. १.७.२०२१ पासून पासून पुढील सुचना मिळेपर्यंत बिलासपूर येथून दर गुरुवारी सकाळी ११.२० वाजता सुटेल आणि पुण्याला दुस-या दिवशी ०९.०५ वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, भाटापारा.
संरचनाः १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : पूर्णपणे आरक्षित अतिजलद विशेष गाडी क्रमांक 08230 साठी बुकिंग दि. २३.६.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
— — –


