भुसावळ –
विद्युत इंजन कारखाना , कारखाना लेखा अधिकारी कार्यालय आणि वरिष्ठ सामग्री प्रबंधक कार्यालय भुसावळ द्वारा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अंतिम भुगतान न मिळाल्या बाबतच्या प्रश्नांवर विचार विमर्श करण्याकरता विद्युत इंजन कारखाना भुसावळ येथे दिनांक 24.07.2021 मंगळवार रोजी सकाळी 10.30 ते 13.00 वाजता पेन्शन अदालत चे आयोजन केले आहे तरी संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज दिनांक 30.06.2021 बुधवार पर्यंत मुख्य कारखाना प्रबंधक विद्युत इंजन कारखाना मध्य रेल्वे भुसावळ यांच्या कार्यालयात तीन प्रती सह पाठवाव्यात. अर्जात खालील बाबीचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची पूर्ण नाव आणि पत्ता, सेवा निवृत्तीच्या वेळी असलेला हुद्दा , सेवानिवृत्तीची तारीख आणि सेवानिवृत्तीचे कारण , समस्या विषयी संक्षिप्त ,तपशील बँकेचे नाव व खाते क्रमांक ( IFSC No / MICR ), अंतिम वेतन आणि वेतनमान, पीपीओ क्रमांक , टोकन नंबर व पीएफ नंबर, पेन व मोबाईल नंबर ,आधार कार्ड नंबर



