भुसावळ (प्रतिनिधी )-
आदर्श हायटेक आय टी आय येथे रोजगार मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी तरुणांना केले आव्हान.
भुसावळ येथील प्रगती बहु उद्देशीय संस्था संचलित आदर्श हाय टेक प्रा.आय टी आय आणि रावेर येथिल महाजन प्रा.आय टी .आय यांच्या संयुक्त विद्यमानाने आदर्श हाय टेक प्रा.आय टी आय,कुऱ्हे पानाचे येथे नुकताच रोजगार मेळावा पार पडला रोजगार मेळाव्याचे उदघाटन भुसावळचे आमदार संजय सावकारे ह्यांच्या हस्ते झाले या प्रसंगी ते बोलत होते आपल्या भाषणात त्यांनी नोकरी साठी आलेल्या उमेदवारांना स्वयं रोजगाराकडे वळा आणि उद्योजक व्हा आणि नोकरी करिता घर सोडा आणि मोठे व्हा असे आवाहन केले,
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.वसंतराव झारखंडे हे होते,त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्रातून संस्थेतेला मिळालेल्या 4 स्टार ग्रेडींग बद्दल संस्थेचे अभिनंदन करून ,बेरोजगारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्या बद्दल संस्थेचे कौतुक केले,
कार्यक्रमाला अतिथी म्हणून गुड्ड अग्रवाल उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष कैलास महाजन यांनी आपली संस्था नेहमी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देयून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहील आणि तंत्र शिक्षणात आंमच्या आय टी आयचे नाव पूर्ण महाराष्ट्र मध्ये नावलौकिक मिळवू असा आत्मविश्वास व्यक्त केला .
सदरील रोजगार मेळाव्यात कंपनी प्रतिनिधी म्हणून यशस्वी ग्रुप तर्फे प्रसाद बोकाडे यांनी मुलांच्या मुलाखती ह्या थेट तसेच ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेतल्या असून 150 बेरोजगारांना रोजगार मिळेल असे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाजन आय टी आय चे प्राचार्य एं .बी.तडवी यांनी केले आणि आभार आदर्श हाय टेक आय टी आय चे प्राचार्य एस.के.कुरेशी यांनी केले असून कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी दोन्ही आय टी आय तील निदेशक तथा कर्मचारी यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव शिवाजी पाटील ,संस्थेचे संचालक प्राजक्त पाटील ,गजेंद्र महाजन आणि संस्थेतील समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होते .या भव्य रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातून आणि बाहेरून मोठया प्रमाणात उमेदवारांचा प्रतिसाद लाभला असून रोजगार मेळाव्यासाठीआर.बी.महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.



